एलन मस्कबरोबरच जेफ बेझोसही अंतराळात वसाहतींसाठी उत्सुक

डिजिटल प्रभात – अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी नुकतेच जाहीर केले आहे की, आपण
वर्षाअखेरीस कंपनीच्या सीईओ पदावरून पायउतार होणार आहोत. मात्र, कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून ते कायम राहणार आहेत. कंपनीच्या सीईओ पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर ते त्यांच्या ब्लू ओरिजन या कंपनीच्या कामात लक्ष घालणार आहेत. अंतराळ यानांच्या उत्पादनाच्या क्षेत्रात ही कंपनी काम करते.

टेस्लाचे सर्वेसर्वो एलन मस्कदेखील त्यांच्या स्पेसएक्स कंपनीत जास्त लक्ष घालत असतात. अंतराळ याने पाठवण्यासाठीची प्रक्षेपके पुन्हा वापरता यावीत आणि अंतराळ प्रवास सुरक्षित, सहजसोपा व्हावा, प्रवासाचा खर्च कमी व्हावा यासाठी मस्क यांची स्पेसएक्स काम करत आहे.

जेफ बेसोझ यांची ब्लू ओरिजिन देखील अशाच प्रकारचे काम करत आहे. त्याच्या या कंपनीचे घोषवाक्य आहे, Gradatim Ferociter याचा अर्थ एक-एक पाऊल, आक्रमकतेने अत्यंत सृजनशीलतेने काम करून नव्या गोष्टींचा माग घेत राहणे हा बेझोस यांचा स्वभाव आहे.

लहानपणी ते गॅरेजमध्ये काम करून अनेक नव्या गोष्टींचा मागोवा घेत असत. त्यावेळी त्यांनी जुन्या टायरमध्ये सिमेंट भरून घराचे फाटक आपोआप बंद होईल अशी यंत्रणा तयार केली होती. छत्री आणि टिनफॉईलचा वापर करून त्यांनी सौर कुकर बनवला होता. नुकत्याच प्रकाशित झालेल्या आणि वॉल्टर आयझॅकसन यांची प्रस्तावना असलेल्या एका पुस्तकात त्यांच्याविषयी माहिती देण्यात आली आहे.

त्यानुसार त्यांना लहानपणापासूनच अंतराळाचे आकर्षण आहे. अपोलो 11 मोहिमेविषयीचे कार्यक्रम पाहणे त्यांना आवडायचे. अपोलो 11 मोहिमेद्वारे नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले आणि मानवी वाटचालीत मोठा इतिहास घडला. त्यानंतर बेझोस स्टार ट्रेकचे चाहते बनले.

विवाहानंतर एका वर्षाने म्हणजेच वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून
दिली आणि लक्षावधी पुस्तके उपलब्ध असतील असे ऑनलाईन बुकस्टोअर सुरु केले. त्यावेळी
पुस्तकांसाठी ऑनलाईन फ्लॅटफॉर्म सुरु करणे हे एखाद्या शोधापेक्षा कमी नव्हते.

त्यांचा निर्धार पक्का होता आणि त्यांना पत्नीची आणि कुटुंबियांची साथ मिळाली. त्यातूनच अॅमेझॉनचा जन्म झाला. 16 जुलै 1995 रोजी जेफ आणि मॅकेन्झी यांनी सिएटलजवऴ भाड्याने घेतलेल्या टूबीएचके अपार्टमेंटमधून अॅमेझॉनची सुरवात झाली. आता 27 वर्षानंतर जेफ बेझोस यांनी कंपनीच्या सीईओपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

ब्लू ओरिजिन या अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या कंपनीत आता ते लक्ष घालणार आहेत. ब्लू ओरिजिन या कंपनीची वॉशिंग्टनमध्ये 2019 मध्ये स्थापना झाली तेव्हा बेझोस म्हणाले होते, मी या कंपनीकडे प्लॉन बी म्हणून पहात नाही किंवा पृथ्वी नष्ट होईल तेव्हा सुटकेचा मार्ग म्हणूनही पहात नाही.

हा विस्ताराचा मार्ग आहे. ज्याठिकाणी मानवाला स्थलांतरित होता येईल. कारण अर्थव्यवस्था आणि लोकसंख्या वाढतच राहणार आहे. पुढील पिढ्यांसाठी अंतराळात वसाहती स्थापित करण्याचे स्वप्न मी देखील पाहतो. पृथ्वीभोवती शक्तीशाली गुरुत्वाकर्षण आहे आणि इथून सगळे घेऊन जाणे शक्य होणार नाही. त्याठिकाणी असणारी नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करण्याची क्षमता आपण विकसित केली पाहिजे.

ज्याप्रमाणे अॅमेझॉनसाठी 1994 मध्ये पायाभूत सुविधा तयार झाल्या होत्या त्याप्रमाणे भविष्यातील अंतराळ उद्योजकतेसाठी पायाभूत सुविधा तयार झाल्या की अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडून येतील. वेगाने घडतील. या पिढीने अंतराळात पोचण्याचे मार्ग तयार केला, पायाभूत सुविध निर्माण केल्या की, हजारो व्यावसायिक वास्तवातील अंतराळ उद्योग क्षेत्र निर्माण करतील आणि मला त्यांना प्रोत्साहन द्यायचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.