दहशतवाद्यांचे पाकिस्तानवरच फुत्कार; चार पाकिस्तानी जवान ठार

पेशावर: पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर  दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत काल चार पाकिस्तानी सैनिक ठार झाले. उत्तर वझिरीस्तान प्रांतात वेझदा सार भागात काही दहशतवादी आश्रयाला असल्याची माहिती मिळाल्यावरून लष्कराने तेथे शोध मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी लष्कराच्या पथकावर दहशतवाद्यांनी संघटितपणे हल्ला केला.

त्यावेळी झालेल्या धुमश्‍चक्रीत हे चार जवान ठार झाले त्याचवेळी चार दहशतवादीही लष्कराकडून मारले गेले आहेत. दहशतवाद्यांचा अड्डा या कारवाईत लष्कराने पूर्ण उद्‌ध्वस्त केला.

मात्र तेथील उर्वरीत दहशतवादी पुन्हा अफगाणि हद्दीत पळून जाण्यात यशस्वी झाले. अफगाणिस्तानात आश्रयाला असलेले हे तालिबानी दहशतवादी पाकिस्तानी हद्दीत येऊन सतत हिंसक कारवाया करीत असतात. त्यांना पायबंद घालण्यात अजून पाक लष्कराला यश आलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.