जळोची : बारामती तालुक्यातील मेडद गावात हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून तालुका पोलिसांनी तब्बल २ लाख २० हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी बाळू बगाडे,महादेव सुरेश बागाव( दोघे.रा . मेडद,ता.बारामती) यांच्यासह कच्चामाल पुरवणाऱ्या किराणा दुकानदारावर तालुका पोलीस ठाण्यात दारूबंदी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेडद गावालगत वाहणाऱ्या कऱ्हा नदीच्या झाडाझुडपात गावठी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळाली होती. त्यानुसार सदर ठिकाणी कारवाई केली असता या कारवाईत गावठी दारू तयार करण्याचे साहित्य व रसायन असा तब्बल २ लाख २० हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या अधिपत्याखाली पोलीस उप निरीक्षक संदिप गोसावी, सुरेश भोई, तानाजी गावडे,आप्पा दराडे, वैभव साळवे, रमेश केकान, गणेश काटकर, राहुल लाळगे, जयश्री गवळी, लता हिंगणे व श्रीकांत गोसावी यांनी केली आहे.