फरार दहशतवाद्याकडून ऑडिओ क्लिप प्रसिद्ध
नवी दिल्ली : नोबेल पारितोषिक विजेती पाकिस्तानी तरुणी मलाला युसुफझाईवर 2012 मध्ये हल्ला करणारा आणि पेशावर आर्मी स्कूलवर दहशतवादी हल्ला करणारा एहसानुल्लाह एहसान पाकिस्तानी तुरूंगातून फरार झाला आहे. तरूंगातून फरार झाल्यानंतर एहसानुल्लाह एहसान याने एक ऑडिओ क्लीप प्रसिद्ध केली आहे. या ऑडिओ क्लीपला पाकिस्तानी लष्कर किंवा सरकारकडून अधिकृत असल्याचे घोषित केले नाही.
गुरुवारी सोशल मीडियावर एहसानुल्लाह एहसानची एक ओडिओ क्लीप समोर आली आहे. ज्यामध्ये 11 जानेवारी 2020 रोजी तो पाकिस्तानी सुरक्षा एजन्सींना चकवा देऊन फरार झाल्याचा दावा करत आहे. तरूंगातून फरार झाल्याचा दावा करतानाच या ऑडिओ क्लीपमध्ये एहसानुल्लाह एहसान पाकिस्तानी लष्करावर वचन पूर्ण न करण्याचा आरोप करत आहे.
अल्लाहच्या मदतीने 11 जानेवारी 2020 रोजी सुरक्षा एजन्सीच्या तरूंगातून फरार होण्यात यश आले. एहसानुल्लाह एहसानने ऑडिया क्लीपमध्ये आपल्या ठिकाणाचा उल्लेख करणे टाळले आहे. मात्र, तुरूंगात व्यतित केलेल्या आणि भविष्यातील योजानावर सविस्तर सांगू असे या ऑडिओ क्लीपमध्ये म्हटले आहे. दहशतवादी एहसानुल्लाह एहसानची सोशल मीडियावर व्हायरल होणारी ऑडिओ क्लीप खरी असल्यास पाकिस्तानच्या तालिबान संपवण्याच्या अभियानाला हा मोठा धक्का असणार आहे.
2012 मध्ये महिला शिक्षणासाठी काम करणाऱ्या मलालावर पाकिस्तानच्या स्वात घाटीमध्ये गोळीबार झाला होता. शिवाय 16 डिसेंबर 2014 रोजी पेशावरमधील आर्मी स्कूलवर दहशतावदी हल्ला झाला होता. यामध्ये 132 विद्यार्थांसह 149 जणांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही हल्ल्यात दहशतवागी एहसानचा समावेश होता. दरम्यान, मुस्लिम महिलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या मलाला यूसुफजईला मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.