मुंबई – 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे च्या रूपात साजरा केला जातो. जग भरात प्रसिद्ध झालेला हा दिवस तरुण प्रेमी जोडप्यांसाठी तर एखाद्या सणापेक्षा कमी नाही. आजच्या दिवशी गुलाबाचं फुलं देऊन प्रेम व्यक्त करतात. फार जास्त काही न बोलता समोरच्या व्यक्तीसमोर आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सर्वात चांगली आणि सोपी पद्धत आहे. तर आजच्या दिवशी जाणून घेऊया गुलाबाचं फुलं देऊन प्रेम व्यक्त करण्याच्या काही खास पद्धती…
प्रेमात लाल रंगला एक वेगळेच स्थान आहे. लाल गुलाब हा रोमान्स आणि पॅशनशी संबंधित मनाला जातो. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे ‘ हा संदेश हा गुलाब देतो.
पिवळा गुलाब हा मैत्रीसाठी वापरला जातो. पिवळ्या रंगाच्या गुलाबाचे गुच्छ देणे सांगते की तू माझा जीवलग मित्र/मैत्रीण होतास आणि कायमस्वरूपी राहशील. कारण पिवळा रंग हा आनंद देणारा असतो.
पांढरा गुलाब हा साधेपणा आणि शांतीचे प्रतिक मानला जातो. तसेच, हा रंग निर्मळ प्रेमाचे प्रतीक आहे.
पिंक गुलाब हा समोरच्या व्यक्तीप्रति कृतज्ञता आणि आभार व्यक्त करण्यासाठी वापरला जातो.
जर तुमचे Love at first site असेल तर लॅवेंडर रंगाचा गुलाब देऊन तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. दरम्यान, ह्या रंगाचा गुलाब मिळणे अतिशय कठीण असते.