श्रीनगर : काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस आणि एका पत्रकारासह 10 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जम्मू काश्मीर पोलिसांनी एक ट्वीटद्वारे हि माहिती दिली. दहशतवाद्यांनी उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर ग्रेनेड हल्ला केला. त्यात १० जण किरकोळ जखमी झाले. परिसरात नाकाबंदी करून शोध मोहीम हाती घेण्यात आलीआहे.
दहशतवाद्यांनी सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला अनंतनागच्या कडेकोट पोलीस बंदोबस्त असलेल्या डीसी कार्यालयाबाहेर एका गस्ती पथकावर ग्रेनेड हल्ला केला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रेनेड रस्त्याच्या कडेला जाऊन फुटला आणि त्यामुळे तिथे उभे असलेले लोक जखमी झाले. अजून कुठल्याही संघटनेने किंवा व्यक्तीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.