श्रीनगर – काश्मीरमधील वडगाम जिल्ह्यातील हिश्रू भागात बुधवारी संध्याकाळी टीव्ही अभिनेत्री, टिकटॉक स्टार अमरीन भटची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार,अमरीनवर बुधवारी रात्री ८ वाजता तिच्या घराबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत अमरीन यांच्या 10 वर्षीय भाचा गंभीर जखमी झाला आहे. गोळीबारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, रात्री आठच्या सुमारास अमरीन भट चदूरा भागातील तिच्या घराबाहेर भाचा फुरहान जुबेरसोबत उभी होती. यादरम्यान तेथे पोहोचलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यानंतर काही वेळानी जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं
लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अमरीनच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. या हल्ल्यामागे लष्कराच्या तीन दहशतवाद्यांचा हात असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांचे म्हणणे आहे.पोलिसांना संपूर्ण परिसर सील केला असून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
अमरीन सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. देशात टिकटॉकवर बंदी येण्यापूर्वी ती या प्लॅटफॉर्मवरील तिच्या व्हिडिओंसाठी खूप प्रसिद्ध होती. सोशल मीडियावर तिच्या फॉलोवर्सची संख्याही लाखोंच्या घरात होती.