मुंबई – अभिनेता रितेश देशमुखने वडील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त एक भावनिक पोस्ट समाज माध्यमांवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मध्ये रितेशने वडीलांचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्याचे दोन्ही मुले विलासराव देशमुख यांच्या फोटोसमोर हात जोडताना दिसून येत आहे. अभिनेत्याने या फोटोसोबत एक पोस्टही लिहिली आहे.
I miss you !! Happy Birthday Pappa ! #VilasraoDeshmukh pic.twitter.com/mzas4mkhPa
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 26, 2022
वडील विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेशने पोस्टमध्ये लिहिले, ‘मला तुम्हाला मिठी मारायची आहे. मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मला तुम्हाला हसताना बघायचं आहे. मला तो क्षण पाहायचा आहे, जेव्हा तुम्ही माझ्या पाठिवर हात ठेवून म्हणता की, मी तुझ्या कायमसोबत आहे. मला तुमचा हात पकडून चालायचं आहे. मला तुमच्यासोबत खेळायचं आहे. हॅप्पी बर्थ-डे पप्पा, मला तुमची आठवण येते.’ अशी भावनिक पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे.
Happy Birthday PAPPA, Miss You everyday. #VilasraoDeshmukh75 pic.twitter.com/P7zY1rOESi
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 26, 2020