बॉलिवुडमधील सर्वाधिक फिट आणि हॉट अभिनेत्रीपैकी एक शिल्पा शेट्टी-कुंद्रा आज आपल्या लग्नाची ऐनिवर्सरी सेलिब्रेट करत आहे. या खास क्षणी शिल्पा आणि राज यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही ऐनिवर्सरी त्यांच्यासाठी खूपच खास आहे, कारण या सिलेब्रिटीजच्या लग्नाला एक दशक पूर्ण झाले आहे.
शिल्पा आणि राज हे या दिवशी ग्रॅंड सेलिब्रेशन करणार नसून खास पद्धतीने साजरी करणार आहे. ही जोडी आजच्याच दिवशी 2009मध्ये विवाहबंधनात अडकली होती. हे दाम्पत्य ऐनिवर्सरीनिमित्त तीन दिवसांसाठी जपान दौ-यावर गेले आहे. या खास दिवशी शिल्पाने जपानमधील एक सुंदर असा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात दोघेजण एकमेकांना किस करताना दिसत आहे.
शिल्पाने हा बुमरॅंग व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “हे स्थळ जगातील सुंदर अशा स्थळापैकी एक आहे. जो निसर्ग सौंदर्याचा एक चमत्कारच मानला जातो. न केवळ क्योटोतील शरद ऋतुचा आनंद मिळाला, तर किसही मिळाला. हॅपी ऐनिवसर्ररी मेरे कुकी राज कुंद्रा, 10 वर्षे पूर्ण.’ दरम्यान, वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास शिल्पा आपल्या आगामी “निकम्मा’ चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे.