नवी दिल्ली – देशातील नव्या कोविड केसेसची संख्या आता 20 हजाराच्याही खाली आहे. काल दिवसभरात देशात 18 हजार 795 नवीन कोविड रूग्ण आढळून आले आहेत.कोविड रूग्णांची संख्या इतक्या खाली येण्याची 201 दिवसांतील ही पहिली वेळ आहे.
दरम्यान देशातील करोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्याही कमालीची घटली असून ती संख्या काल 2 लाख 92 हजार 206 इतकी होती. दरम्यान काल दिवसभरात देशात कोविडमुळे 179 जणांचे मृत्यू झाले. मृतांची संख्याहीं 192 दिवसांतील नीचांकी संख्या आहे.
कालचे मृत धरून देशातील एकूण कोविड मृतांची संख्या 4 लाख 47 हजार 373 इतकी झाली आहे. देशात मधल्या काळात सतत 93 दिवस कोविड रूग्णांची संख्या 50 हजारांच्यावर होती. कालचा पॉझिटीव्हीटी रेट 1.42 टक्के इतका होता.