मुंबई – भारताचा एकेकाळचा अव्वल टेनिसपटू लिअँडर पेस घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी आढळला असून त्याला वांद्रे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्याची पत्नी व प्रसिद्ध अभिनेत्री रिया पिल्ले हिला दरमहा दीड लाख रूपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
पेस रियासह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. रियाने पेसवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणावर न्यायालयाने शुक्रवारी हा आदेश दिला आहे. न्यायालयाने पेसला याच महिन्यात दोषी ठरवले होते. मात्र, त्या आदेशाची प्रत नुकतीच त्याच्या हाती आली.
न्यायमुर्ती कोमलसिंह राजपूत यांनी रियाला घरभाड्यापोटी दरमहा 50 हजार रुपये व पोटगी म्हणून दरमहा 1 लाख रुपये देण्याचा आदेश पेसला दिला. रियाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी पेसविरूद्ध 2014 साली न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिने आपण पेससह आठ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात होते, असा दावा केला होता.