लंडन – जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या डॅनिल मेदवेदेवने अंतिम सामन्यात ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीमचा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.रशियाच्या मेदवेदेवचे हे एटीपी फायनल्सचे पहिले विजेतेपद आहे. तर, डोमिनिक थीम उपविजेता ठरला.
विजेतेपदाच्या लढतीत डॅनिल मेदवेदेवने डोमिनिक थीमचा 4-6, 7-6 (2), 6-4 अशा तीन सेटमध्ये पराभव केला. ही लढत 2 तास 2 मिनिटे चालली. याआधी या दोघांमध्ये 4 सामने झाले होते. त्यातील 3 सामन्यात थिमने तर मेदवेदेवने 1 सामन्यात बाजी मारली होती, पण यावेळेस डॅनिल मेदवेदेवने बाजी मारत विजेतेपद पटकावले.
मेदवेदेवच्या नावे नवीन विक्रम….
(1)मेदवेदेव याने यंदाच्या स्पर्धेत जागतिक क्रमावारीत पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या खेळाडूंचा पराभव केला. असा विक्रम करणारा तो पहिलाच खेळाडून ठरला. त्याने जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोविचचा मागील सप्ताहात पराभव केला होता. त्यानंतर उपांत्यफेरीत दुसऱ्या क्रमांकावरील राफेल नडालचा तर तिसऱ्या क्रमांकावरील थीमचा अंतिम सामन्यात पराभव केला.
(2)याआधी 2009 मध्ये निकोले डेविडेंको याने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा डॅनिल मेदवेदेव हा रशियाचा पहिलाच खेळाडू ठरला.
(3)मेदवेदेवने आपल्या कारकिर्दीत तीनवेळेस राफेल नडालचा सामना केला होता, पण एकादाही त्याला विजय साकारता आला होता. मात्र. यंदाच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात 2 तास 36 मिनिटे चाललेल्या लढतीत राफेल नडालचा पराभव करत मोठा उलटफेर करत अंतिम सामना जिंकत स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले. आणि या स्पर्धेला सलग पाचवा नवा विजेता मिळाला.
एटीपी फायनल्सचे विजेते (मागील दहा वर्षातील)-
2010 : रॉजर फेडरर
2011 : रॉजर फेडरर
2012 : नोव्हाक जोकोविच
2013 : नोव्हाक जोकोविच
2014 : नोव्हाक जोकोविच
2015 : नोव्हाक जोकोविच
2016 : अँडी मरे
2017 : ग्रिगोर दिमिट्रोव
2018 : अॅलेक्झांडर झ्वेरेव
2019 : स्टिफानोस त्सित्सिपास
2020 : डॅनिल मेदवेदेव
दरम्यान, उपांत्य फेरीच्या सामन्यात डोमिनिक थीमने जोकोविचचा 7-5, 6-7(10), 7-6(5) असा तर दुसरीकडे मेदवेदेवने नडालचा 3-6,7-6 (7/4), 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. .