पिंपरी – पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिंचवड स्टेशन येथील साईबाबा नगर येथे गुरुवारी (दि. 28) रात्री घडली.
हरीश प्रकाश शेलार (वय 29), सतीश विजय जाधव (वय 19), विजय गौतम शेलार (वय 29), रेश्मा विजय जाधव (वय 40), सीता गणेश कसबे (वय 45, सर्व रा. साईबाबा नगर, चिंचवड स्टेशन) व अन्य पाच जण (नाव माहिती नाही) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलीस कर्मचारी दीपक गोरोब टेंकाळे यांनी गुरुवारी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपी एका व्यक्तीस त्रास देत असल्याबाबत त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. घटनास्थळी पोलीस गेले असता आरोपींनी जमावबंदी असतानाही बेकायदा जमाव जमवून आरडाओरडा केला.