मुंबई – मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार नवी कोरी गाडी, घरं खरेदी करत आहेत. सई ताम्हणकरने काही दिवसांपूर्वीच मुंबईत घर खरेदी केले. तर अभिनेत्री मानसी नाईकने देखील नवी गाडी खरेदी केली होती. त्यानंतर ‘स्वाभिमान’ फेम अभिनेता अक्षर कोठारीनेही आता नवीन गाडी खरेदी केली आहे. कौतुकस्पद म्हणजे त्याने ही कार त्याच्या आई-वडिलांना भेट म्हणून दिली आहे. याचा एक खास व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अक्षरने इनस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना कारची पहिली झलक दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या आईच्या हस्ते गाडीची पूजा केली जात असल्याचे दिसत आहे. ही गाडी त्याने आपल्या आई -वडीलांना भेट देत पोस्टमध्ये लिहिले की, “ज्यांनी मला घडवलं…त्यांच्यासाठी ही छोटीशी भेट! लव्ह यू मम्मी पप्पा.” याशिवाय त्याने “सुखाच्या शोधात आपल्याला तृप्ती मिळतेच असे नाही, खरा आनंद हा शोधण्यातच असतो,” असे डेनिस वेटलीचा एक कोट देखील दिला आहे.
View this post on Instagram
अक्षरच्या पोस्टनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक जण त्याचे कौतुक करत आहे. सुकन्या मोने, श्रुती मराठे यासारख्या इतर कलाकारांनी देखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय ‘मुलगा असावा तर असा’ अशा प्रतिक्रिया देत चाहते त्याचे कौतुक करत आहेत.