मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने आपल्या अभिनयातून लाखो प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
View this post on Instagram
अभिनयसोबतच अनेक गोष्टींमध्ये तिचा सहभाग पाहायला मिळतो. नुकतच तिने करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान केले होते. तर आता तिच्या वाढदिवशी तिने चाहत्यानां एक सरप्राईज दिले आहे.
View this post on Instagram
तेजस्विनी ही अभिनयाव्यतिरिक्त एक फॅशन डिझायनर देखिल आहे. “तेजाज्ञा’ हा तिचा क्लॉथिंग ब्रॅंड देखिल आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावेसोबत मिळून तिने या ब्रॅंडची निर्मिती केली. या ब्रॅंडमार्फत उत्तम साड्या बनवल्या जातात.
View this post on Instagram
आता तेजस्विनीने दुसऱ्या एका दिशेने वाटचाल सुरू केली आहे. तिने आता चित्रपट निर्मितीसाठी काम करयाचे निश्चित केले आहे. त्यासाठी तिने तिच्या नव्या प्रोडक्शन हाऊसची घोषणा केली आहे.
View this post on Instagram
“क्रियेटिव्ह व्हाईब’ अस या प्रोडक्शन हाऊसचे नाव असून तेजस्विनीने तिचा मित्र संतोष खेर याच्यासोबत हे सुरू केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने सगळ्यानांच चकित केले आहे.
View this post on Instagram