मुंबई – चित्रपटाद्वारे समाजातील सामाजिक विषयांचे चित्र प्रेक्षकांसमोर मांडणारे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक ‘प्रवीण तरडे’ पुन्हा एकदा वेगळा विषय घेऊन आले आहेत.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे ‘हंबीरराव मोहिते’ यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्रात पसरली आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास प्रविण तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आणणार आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, आज (दि. 6) शिवस्वराज्य या पवित्र पावन दिवशी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा ऑफिशल टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
चित्रपटाच्या टिझर मधून शिवाजी महाराजांचे सिंहासनाधिश्वर दर्शन घडून येत आहे. हंबीरराव मोहिते चित्रपटात मराठमोळा अभिनेता ‘गश्मीर महाजनी’ शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारणार आहे.
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत स्वतःहा प्रवीण तरडे असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
तर बहिर्जी नाईक, सोयराबाई, औरंगजेब, संताजी धनाजी आणि सर्जाखान या महत्वाच्या भूमिका पडद्यावर कोण साकारणार याबद्दल अद्याप कोणताही खुलासा केला नाही. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांची आहे.