बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आपल्या करियर आणि आयुष्याबद्दल कोण-कोणती स्वप्ने पाहिली नसतील, परंतु आत्महत्या केल्याने ही सर्व स्वप्ने चिरडली गेली आणि तोही सर्वापासून दूर गेला.
स्वतःचा “दिल बेचारा’ हा चित्रपटदेखील पाहण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. सुशांतसिंह राजपूतंचा “दिल बेचारा’ हा शेवटचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिस्ने हॉट स्टार प्लसवर “दिल बेचारा’ 24 जुलैला प्रदर्शित होणार आहे.
यातच नुकतेच डिस्ने हॉट स्टारने इन्स्टाग्रामवर या चित्रपटातील टाईटल सॉंग चा टिझर प्रदर्शित केला आहे. या टिझरमध्ये सुशांतची एन्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी आहे सध्या सोशल नेटवर्कमध्ये या गाण्याचा टिझर चांगलाच पसंतीत येत आहे.