नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच एकदिवसीय सामन्यांतून निवृत्ती जाहीर करेल असे खळबळजनक विधान भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले आहे. धोनीच्या निवृत्तीवरून सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी तो टी-20 क्रिकेट खेळतच राहील, असेही शास्त्री यांनी सांगितले आहे.
"One thing I know about Dhoni is that he will not impose himself on the team."
Ravi Shastri feels the experienced India wicket-keeper batsman may shift his focus solely to 20-over cricket.https://t.co/Jvk75COjCZ
— ICC (@ICC) January 10, 2020
धोनीने कसोटी क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती घेतली आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक
स्पर्धेत धोनी संघात स्थान मिळवेल मात्र त्यासाठी त्याला आयपीएलमध्ये कामगिरी सिद्ध करावी लागेल, असे संकेतही शास्त्री यांनी दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आपण धोनीच्या निर्णयाचा अन् त्याचा आदर करायला हवा. तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अविरत खेळतो आहे. भारतीय क्रिकेटची त्याने सेवा केली आहे. आता सध्या घडीला, त्याचे वय लक्षात घेता टी-२० हे एकमेव क्रिकेट तो खेळू शकतो.’