हिंगोली प्रतिनिधी
शिवशंकर निरगुडे
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील कला शिक्षक दिलीप दारव्हेकर यांनी खास पद्धतीने अभिवादन केले आहे. महात्मा गांधीजी यांच्या जीवनातील महत्त्वाचे सत्याग्रह, आंदोलने कार्य यांच्या अक्षरलेखनातून ध्यानस्थ महात्माजी दारव्हेकर यांनी साकारले आहेत. चरख्याच्या धाग्यातून अखंड भारत जोडण्याचे कार्य करणाऱ्या राष्ट्रपित्यास आपल्या लेखणीतून विनम्र अभिवादन त्यांनी केले आहे.
आखाडा बाळापूर येथील कला शिक्षक नेहमीच महापुरुषांच्या जयंती निमित्त आपल्या लेखणीतून किंवा रांगोळीतून अभिवादन करत असतात. हिंगोली जिल्ह्यातील कवडा येथील मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयातील दिलीप दारव्हेकर हे शिक्षक आहेत. नुकतेच गणपती उत्सवानिमित्त त्यांनी मातीपासून झाड देणार गणपती तयार केला होता. या गणपतीमध्ये त्यांनी बिया टाकल्या होत्या. इतकेच काय, तर अनेक जणांना त्यांनी स्वत: हे मातीचे गणपती वाटले आहेत. आज सुध्दा त्यांनी स्वत: आपल्या अक्षरलेखणीतून राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना अभिवादन केले आहे.