उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुढाकाराने अयोध्येतील मंदिरांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्येतील मठ आणि मंदिरांचा कर माफ करण्यात आला आहे. अयोध्या महापालिकेने यासाठी ठराव केला पारित केला आहे. यूपीचे कॅबिनेट मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मठ मंदिरे करमुक्त करण्याच्या सीएम योगींच्या घोषणेवर महापालिकेने ठराव मंजूर केला. मठ मंदिरांना आता फक्त प्रतिकात्मक कर भरावा लागणार आहे. सर्व मठ, मंदिरे आणि आश्रम करमुक्त करण्यात आले आहेत, जे व्यावसायिक वापरासाठी नाहीत. यासोबतच मंदिरांवरील थकीत करही माफ करण्यात आला आहे.
याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत पोहोचले होते. त्यावेळी अयोध्येतील मंदिरे आणि धर्मशाळा करमुक्त करण्यात येतील अशी घोषणा त्यांनी तेथे केली होती. सीएम योगींच्या या घोषणेवर महापालिकेने प्रस्ताव आणून शिक्कामोर्तब केले आहे. याशिवाय मंदिरांचा थकीत करही माफ होणार असल्याचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे अयोध्येच्या महापौरांनी सांगितले आहे.