बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारियाला सध्या हिल स्टेशन मसुरीची आठवण येत आहे. ताराने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती एका स्टेशनरी मोटारसायकलवर पोज देताना दिसत आहे. यात तारा जीन्स आणि पांढऱ्या रंगाच्या जॅकेटमध्ये खूपच हॉट अंदाजात दिसत आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये ताराने लिहिले की, मला बाइक चालविण्याचे नाटक करत येत असल्याचे आठवते. पण मला सर्वाधिक आठवण येते ती मसुरीची. ताराने आपल्या करियरची सुरवात बाल कलाकार
म्हणून 2010 मध्ये टीव्ही शो “बिग बडा बूम’ यातून केली होती.
तसेच “द सूट लाइफ ऑफ करण ऍण्ड कबीर’ आणि “ओए जस्सी’सारख्या शोमध्येही तिने काम केलेले आहे. अभिनयासोबतच ताराला गाणे गाण्याचाही छंद आहे. याशिवाय बॉलिवूडमध्ये डेब्यू करत तिने “स्टूडंट ऑफ द इयर 2′ आणि “मरजावा’ या ऍक्शन चित्रपटातही दमदार भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती दोन चित्रपटांच्या कामात व्यस्त असून “तडप’ आणि “एक व्हिलन 2’मधून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.