Actress Laila Khan Murder Case – अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबियांच्या हत्या प्रकरणात परवेज ताक दोषी ठरविण्यात आले आहे. हा निकाल मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहे. साल 2011 मध्ये लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच सदस्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
घटनेच्या 14 वर्षांनंतर परवेजला दोषी ठरविण्यात आले आहे. तसेच शिक्षेचा निर्णय मंगळवारी देण्यात येणार आहे. परवेज याला न्यायालयाने खुनाचा कट रचणे, खून करणे आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले.
परवेज हा लैला हिच्या आईचा तिसरा पती होता. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी परवेज याला अटक केल्यावर काही महिन्यांनंतर लैला आणि तिच्या कुटुंबीयांचे हत्याकांड उघडकीस आले होते. तसेच, त्यांचे कुजलेले मृतदेह बंगल्यातून बाहेर काढण्यात आले.
या खटल्यात 40 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. हत्या करुन मृतदेह इगतपुरीच्या एका फार्म हाऊसमध्ये पुरल्याचे उघड झले आहे. या घटनेच्या एक वर्षानंतर सर्व मृतदेह सापडले. परवेज ताक हा लैला खान आणि कुटुंबियांसोबत असायचा.
कोण होती लैला खान?
लैला खानने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2002 मध्ये कन्नड चित्रपट ‘मेकअप’मधून केली होती. पण, खरी ओळख राजेश खन्ना स्टारर चित्रपट ‘वफा : ए डेडली लव्ह स्टोरी’ मधून मिळाली. हा चित्रपट 2008 मध्ये रिलीज झाला होता.
बॉक्स ऑफिसवर हा चित्रपटदेखील सुपर फ्लॉप ठरला होता. या चित्रपटाची चर्चा त्यातील बोल्ड दृश्यांमुळे झाली होती. राजेश खन्ना आणि लैला खान यांच्यात अनेक बोल्ड दृश्य या चित्रपटात होते. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर लैला सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करू लागली.
लैला खान आणि तिची आई शेहलिना खानसह तिच्या परिवारातील पाच सदस्य बेपत्ता झाल्याची तक्रार लैलाचे वडील आणि पिता आणि तिच्या आईचे पहिले पती नादिरशाह पटेलने दिली होती.