नवी दिल्ली – पाकिस्तानमधील ननकाना साहिब गुरुद्वारावर कथित लोकांनी दगडफेक केले गेले. भारताने या घटनेचा निषेध केला आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री तापसीने ट्विटरवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक केल्याची बातमी शेअर केली होती.
त्यानंतर तिला तिच्या नागरिकत्वावरून प्रश्न विचारण्यात आला. यावर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. मात्र ट्रोल करणाऱ्यांना तापसीने चांगलेच बेधडक उत्तर दिले आहे.
दरम्यान, ट्विटरवर एका युजरने तिला, ‘तू भारतीय आहेस का’ असा प्रश्न विचारला असता तिने सडेतोड उत्तर देऊन ट्रोलर्सचं तोंड बंद केलं, त्यावर तापसी म्हणाली, ‘आता तुम्हाला पण कागदपत्रे दाखवावी लागतील का?’
Ab tumhaare ko bhi paper dikhaane hai kya ? https://t.co/cinxcQ3x7y
— taapsee pannu (@taapsee) January 6, 2020
दरम्यान,