अभिनेत्री तनुश्री दत्ताने “आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणारी तनुश्री दिर्घ काळापासून मोठया पडद्यावर झळकलेली नाही. आता ती पुन्हा बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
View this post on Instagram
चित्रपटसृष्टीपासून दुरावल्याने तनुश्री खूपच सिंपल लाइफ जगत होती. यामुळे तिचे वजनदेखील खूप वाढले होते. परंतु आता तनुश्रीने स्वतःला खूपच बदलले आहे. तनुश्रीने नुकतेच आपले काही फोटोज् आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तनुश्री दत्ता पहिल्यापेक्षा आता खूपच फिट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
View this post on Instagram
एका व्हिडिओत तिने आपल्या ग्लॅमरस अंदाज दाखवत बॅकग्राउंडमध्ये “आशिक बनाया…’ हे गाणे ऐकू येत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांना जुन्या “आशिक बनाया’मधील तनुश्रीची आठवण येते. तनुश्रीने तब्बल 15 किलो वजन घटविले असून स्वतःला फॅट टू फिट बनविले आहे.
View this post on Instagram
तिचा ट्रांसफॉर्मेशन लुक पाहून चाहते खूपच रोमांचित झाले असून आता त्यांना तिच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, तनुश्रीने अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय साकारला आहे. यापैकी “चॉकलेट’, “भागम-भाग’, “ढोल’, “रिस्क’, गुड बॉय बॅड बॉय’, “सास, बहु और सेंसेक्स’ यासारखे हिट चित्रपट आहेत. याशिवाय तिने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये आपले नशिब आजमाविले आहे.
View this post on Instagram