टाकळी हाजी -टाकळी हाजी (ता.शिरूर) येथे करोनाबाधित महिला आढळल्याने टाकळी हाजी गावठाण व परिसरात दि. 12 ते 25 ऑगस्ट या कालावधीत पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी राजेश खराडे यांनी दिली.
करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. टाकळी हाजी गावातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत.
नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. प्रदीप बिक्कड यांनी केले आहे.