नगर, (प्रतिनिधी) – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना धमकी देणार्या संबंधित व्यक्ति आणि त्यांना पाठबळ देणार्या विरोधात ताताडीने कारवाई करावी, अशी मागणी महायुतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच डाॅ. सुजय विखे यांच्या संरक्षणात वाढ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आ.संग्राम जगताप, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर नगरचे विठ्ठलराव लंघे, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, वसंत लोढा, सचिन पारखी विश्वनाथ कोरडे, विनायक देशमुख, बाबुशेठ टायरवाले, विक्रमसिंह पाचपुते, शिवसेनेचे अनिल शिंदे, यांच्यासह सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीची प्रक्रीया सुरू झाली असताना उमेदवारावा धमकावण्याची बाब अतिशय गंभीर आणि अचारसंहीता नियमांचे उल्लंघन करणारे असल्याची बाब जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. धमकी देणारा व्यक्ति कोणाचा समर्थक आहे, कोणाचे पाठबळ त्यांना आहे. या बाबी उघड होणे अत्यंत गरजेचे असून कारवाई झाल्यानंतर यासर्व गोष्टी समोर येणार असल्याने प्रसारीत झालेल्या ध्वनिफीतीच्या आधारे संबंधित व्यक्तिचे काॅल डिटेल्स टाॅवर लोकेशन तपासून कायदेशार कारवाई करावी, आशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनातून केली आहे.