पुणे – छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी दैवत आहेत. त्यांची झालेली विटंबना ही कधीच सहन केली जाणार नाही. वसमतचे राष्ट्रवादीचे आमदार राजु नवघरे यांनी महाराजांच्या पुतळ्यावर चढून विटंबना केल्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
जाणीवपूर्वक त्यांच्यावर आय. पी. सी 295 ए नुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अनेकांकडे ही मागणी करण्यात आली आहे. त्यावेळी विनोद परदेशी, साहिल कंट्रोलु, विनोद वाघमारे, गणेश बोरसे, अनिकेत भेगडे, नीलेश माझीरे, गणेश जोशी, अजय झडपे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि नीलेश प्रकाश निकम यांच्या माध्यमातून हे आंदोलन केले गेले. जिल्हाधिकारी पुणे यांनी शासनाला निवेदन पाठवून पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.