मुंबई – बॉलिवूड प्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सुद्धा ग्लॅमर्स लुकसाठी चर्चेत असतात. अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या रोल्समुळे नायिकांमधील लुक आणि हटके अंदाजामुळे अभिनेत्री ओळखली जाते.
दरम्यान, आता लॉकडॉऊनमुळे चित्रपट आणि मालिसांचे शूटिंग बंद आहे. त्यामुळे सर्च कलाकार आपल्या घरी असून, सोशल मीडियावर आपले अनेक फोटो शेअर करत असतात. अनेक अभिनेत्रींनी त्यांचा नो मेकअप लुकमधला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या या अभिनेत्रींचा हा नो मेकअप लुक चांगलाच चर्चेत आहे.