अनुष्काचं “होम प्रॉडक्‍शन’

सुई धागा या चित्रपटानंतर गेल्या दोन वर्षांपासून अनुष्का शर्मा चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. आता रोहित शेट्टीच्या फराह खान दिग्दर्शित एका चित्रपटात ती हृतिक रोशनसोबत झळकणार आहे. झुलन गोस्वामी या प्रख्यात महिला क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये अनुष्का दिसणार असल्याची चर्चा आहे.

तसेच तिचे लाडके दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनीही तिला एका चित्रपटात संधी देण्याचे आश्‍वासन दिले आहे. पण अद्यापपर्यंत त्यांचा निर्णय कळलेला नाहीये. दरम्यान, विवाहानंतरच्या तीन वर्षांत आपल्या “क्‍लीन स्टेट फिल्मस्‌’ या बॅनरबाबत अनुष्का सक्रिय झाल्याचे समजते.

यावेळी तिने आपला भाऊ करणेश शर्माला निर्मितीपासून काहीसे लांब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या लॉकडाऊनमुळे मिळालेला वेळ अनुष्का चित्रपटनिर्मितीसाठी खर्ची करत आहे. तिच्या या होम प्रॉडक्‍शनचा पहिला चित्रपट होता “एनएच 10′. या चित्रपटाचे दिग्दर्शक नवदीप सिंह यांच्यासोबत “कॅनडा’ या चित्रपटाची तयारी तिने पूर्ण केली आहे.

हा चित्रपट एनआरआयवर आधारित आहे. यामध्ये अर्जुन कपूर आणि दलजित दोसांज झळकणार आहेत. याखेरीज आपल्या होम प्रॉडक्‍शनतर्फे तिने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत “प्राईसलेस’ नामक एक चित्रपटही करणार आहे. एकूण काय, आगामी काळात अनुष्का आपले करिअर नव्या दिशेने घेऊन जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.