Birthday special : मराठमोळ्या ‘प्रिया’च्या ग्लॅमर्स लूकने फॅन्सला पाडली भुरळ

मुंबई – मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये फैशन ‘क्विन’ च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री ‘प्रिया बापट’ने अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.

तिने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच घर निर्माण केलं आहे. प्रिया सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रीय असते.

दरम्यान, नुकतंच प्रियाने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून, या फोटोतून प्रियाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. सध्या प्रियाचा हॉट अँड ग्लॅमर्स लूक फॅन्सला प्रचंड आवडत आहे.

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये प्रियाने हिरव्या रंगाचा प्रिंटेड शर्ट आणि लाईट ब्लु कलरची डेनिम परिधान केली आहे. प्रिया या लूक मध्ये खूपच सुंदर आणि मादक दिसत आहे. तिचा हा फोटो पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडले.

प्रियाचा हा लूक तिच्या फॅन्सला देखील आवडला आहे. सध्या प्रिया बापटचे हे फोटो सोशल जोरदार व्हायरल झाले असून अनेकांनी तिच्या या फोटोंवर कमेंट आणि लाईक्स चा वर्षाव केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.