ओम लॅंड डेव्हलपर्सची तडवळे प्लॉटींग योजना आकर्षक

दसऱ्यापासून ग्राहकांचा वाढता प्रतिसाद

“ते माझे घर, ते माझे घर…
जगावेगळे असेल सुंदर, असेल सुंदर…’
असे विख्यात कवी ग. दि. माडगुळकर यांनी म्हटलेच आहे. तसेच सुंदर घर तुमचेही व्हावे; असावे असे वाटत असेल, तर ऑफरकडे तुम्ही दुर्लक्ष नक्कीच करणार नाही.

शहरांचा विकास नेहमी चढा अर्थात व्हर्टीकल होत असतो, असे म्हणतात. कमी जागेत जास्तीत जास्त घरे उभी करायची असतील तर उंचच उंच गगनचुंबी इमारती उभ्या राहताना दिसतात. त्यामध्ये मग अर्थातच पार्कींग स्पेस, गार्डन किंवा व्हेन्टीलेशन अशा अनेक गोष्टींविषयी समाधानकारक पर्याय असतातच असे नाही. यामधूनच मग गेल्या काही दशकांत फ्लॅट संस्कृती ही उदयाला आल्याचे दिसते. मात्र, प्रत्येकालाच ही तडजोड मान्य असते, असे नाही. त्यामधूनच मग मानवी मनाची एक घुसमट सुरु असलेली दिसते.

स्वत:चं घर म्हटलं की, एक टुमदार बंगला, त्याभोवती सुंदरसं गार्डन, एक वरचा मजला; आपलं स्वत:च्या मालकीचं संपूर्ण टेरेस, त्यावर झोपाळा आणि संध्याकाळचा सूर्यास्त पहात, चंद्र-चांदण्यांशी हितगुज करत आपल्या प्रियजनांच्या सहवासात घालवायचे क्षण म्हणजे आपलं आयुष्य. मोठ्या शहरात आणि गगनचुंबी इमारतीत असलं सुख कुठून वाट्याला यायला हो?

म्हणूनच पुणे जिल्ह्यातील देहू तीर्थक्षेत्राच्या जवळ नव्याने विकसित होत असलेल्या तडवळे येथे आपण आपल्या स्वप्नातील घराचं चित्र साकारु शकता. ओम लॅंड डेव्हलपर्स ही कंपनी गेल्या काही वर्षांपासून भूविकास आणि बांधकाम क्षेत्रात कार्यरत असून, आपल्या सर्व व्यवहाराच्या विश्‍वासार्हतेवर त्यांनी आपल्या समाधानी ग्राहकांची एक साखळीच तयार केलेली आहे. आता तळवडे परिसरात ओम लॅंड डेव्हलपर्सतर्फे एक प्लॉटींगची योजना आखली असून, एक गुंठा, दोन गुंठे आणि तीन गुंठ्यांसह काही त्यापेक्षा मोठे प्लॉट्‌सही ग्राहकांसाठी अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करुन दिले जात आहे.

नुकत्याच होऊन गेलेल्या दसरा अर्थात विजयादशमीच्या मुहूर्तावर या प्लॉटींग योजनेचा शुभारंभ झाला असून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळायला सुरु झाला आहे. तळवडे-देहू दरम्यान असलेल्या नव्या 60 फुटी रस्त्यालगत ही प्लॉटींगची योजना सुरु असून जवळच तळवडे आयटीपार्क आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे संपूर्ण क्षेत्र पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असून सर्व जमिनी “रहिवासी झोन’ या वर्गात मोडतात. त्यामुळे मनपाच्या कोणत्याही सुविधांपासून येथील नागरिक वंचित राहणार नाहीत, याची हमी देता येते. तसेच प्लॉटींग क्षेत्रात वृक्षारोपणासह स्ट्रीट लाईट्‌स आणि अंतर्गत डांबरी रस्तेही देण्यात येत आहेत. त्यामुळे निसर्गनिरम्य परिसरामध्ये आपले जीवन सुखाने व्यतीत करण्याची संधी कोण सोडेल?

प्लॉटींग लोकेशनपासून अवघ्या 2 किमीवर देहूचे सुप्रसिद्ध गाथा मंदिर, 5 किमीवर निघोजेची महिन्द्रा कंपनी, 7 किमीवर एकीकडे निगडीचा भक्ती-शक्ती चौक; तर दुसरीकडे चाकण औद्योगिक वसाहत अर्थात एमआयडीसी आणि 13 किमीवर तीर्थक्षेत्र आळंदी. नव्या-जुन्याचा संगम आणि अध्यात्माला नव्या युगाची जोड देणारा हा प्रकल्प म्हणजे ग्राहकांसाठी वरदान आहे, असे आम्ही का म्हणतो, ते हे सारे वाचल्यावर लक्षात येईलच. शिवाय प्रत्यक्ष साईट पहायची आहे, त्यांच्यासाठी साईट व्हिजिटचीही सोय केली आहेच.

म्हणूनच, दसरा तर झाला; बुकींगही सुरु झाले; आता दिवाळीला तरी वेळ न करता शहाणपणाचा निर्णय घ्या आणि चेकबुक घेऊनच साईट व्हिजिटसाठी आमच्या ऑफिसला भेट द्या… संपर्क – 9075387487, 7057579637, 7038967302

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.