एकमेकांकडे रागाने पाहण्यावरून तरुणाचा केला खून

पुणे – एकमेकांकडे रागाने पाहण्यावरून तरुणावर धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली आहे.

दरम्यान खून झालेल्या तरुणावर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. अनिकेत घायतडक (वय 28, रा. मांजरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिकेतवर मुंढवा पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे. दरम्यान यातील संशयित शुभम व त्याचे एकमेकांकडे रागाने पाहन्यावरून सतत वाद होत होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.