आलिया भट सध्या खूप बिझी आहे. एकापाठोपाठ एक सिनेमांचे शुटिंग ती पूर्ण करण्याच्या मागे लागली आहे. सध्या ती संजय लिला भन्साळींच्या “गंगूबाई काठियावाडी’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या कामाचा ताण तिला सहन झाला नाही आणि ती आजारी पडली. तिला कालच सर एच.एन.रिलायन्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागले.
View this post on Instagram
थोड्याच वेळात किरकोळ तपासण्या झाल्यावर तिला डिस्चार्जपण देण्यात आला. आज सकाळी फ्रेश होऊन ती “गंगूबाई काठियावाडी’च्या सेटवर शुटिंगसाठी उपस्थित देखील झाली. मात्र आलियाच्या या आजारपणाबद्दल सिनेमाच्या सेटवर कोणालाच काही माहिती नव्हती. त्यामुळे बॅनरकडूनही याबाबत काहीही अपडेट दिला गेला नाही.
View this post on Instagram
“गंगूबाई काठियावाडी’ काही कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गंगूबाईंच्या मुलाने केलेल्या दाव्यानुसार सिनेमात काही तथ्य बदलली गेली आहेत. आता या सिनेमाच्या शुटिंगला रोखण्यासाठी कोर्ट कचेऱ्या सुरू होण्याची लक्षणे दिसायला लागली आहेत. हा सिनेमा आता दिवाळीच्या सुमारास रिलीज होण्याची शक्यता आहे. त्याव्यतिरिक्त आलिया “ब्रह्मास्त्र’ आणि बाहुबलीचे डायरेक्टर राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या “आरआरआर’मध्येही असणार आहे.