चेंगडू (चीन) : चीनमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशच्या पुरूषांच्या विश्व चषक टेबल टेनिस स्पर्धेतील भारताच्या जी. साथियानचे आव्हान शनिवारी संपुष्टात आले आहे. पुरूष एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत जी. साथियानचा एकेकाळी जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी राहिलेल्या आणि सध्या आठव्या स्थानी असलेल्या जर्मनीच्या टिमो बाॅलने ११-७, ८-११, ५-११, ९-११, ८-११ असा पराभव केला आहे.
The moment I realised how good I have played in my debut ITTF World Cup is when the entire Chinese crowd gave me a loud applause on leaving the match hall !!
Put up a great fight but lost out to the legendary Timo Boll 1-4 in Last 16 !! pic.twitter.com/Pn1mFPwOHn
— Sathiyan Gnanasekaran OLY (@sathiyantt) November 30, 2019
जागतिक क्रमवारीत साथियन ३० व्या स्थानावर आहे. ही त्याची पहिलीच विश्व चषक स्पर्धा होती. मात्र आजच्या पराभवामुळे तो विश्व चषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
दरम्यान, २६ वर्षीय साथियानने ड गटातील पहिल्या सामन्यात फ्रान्सच्या सिमन गौझीचा ११-१३, ९-११, ११-८, १४-१२,७-११,११-५, ११-८ असा पराभव करत विजयी सलामी दिली होती. त्यानंतर त्याने या गटातील आपल्या दुस-या सामन्यात डेन्मार्कच्या २४ व्या मानांकित जोनाथनचा ११-३, १२-१०, ७-११, १६-१४, ८-११, ११-८ असा पराभव करत शेवटच्या १६ खेळाडूत स्थान मिळवित उप-उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला होता.