विवेक वळसे पाटील यांची माहिती
मंचर- पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने समाज कल्याण विभागामार्फत 20 टक्के जिल्हा परिषद निधीतून आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघातील मागासवर्गीय वस्त्यांमधील कामांसाठी 1 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.
विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक मागणीनुसार आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघातील मागासवर्गीय वस्त्यांमधील नळपाणी पुरवठा दुरुस्ती करणे, रस्ते व बंदिस्त गटार बांधणे तसेच समाज मंदिरांमध्ये समाज प्रबोधन साहित्य, बॅंजो साहित्य पुरवणे आदि विकासकामांना मंजूरी देण्यात आली आहे. प्रति बॅंजो साहित्य संच 28 हजार व प्रति समाज प्रबोधन साहित्य संच. 16 हजार 700 रुपये प्रमाणे मंजूर झाले आहेत. मंजूर कामे पुढीलप्रमाणे- मोठी उगलेवाडी येथे नळपाणी पुरवठा दुरुस्तीकरणे 3 लाख, लहान उगलेवाडी येथे नळपाणी पुरवठा दुरुस्ती करणे 3 लाख, तळेघर येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये नळपाणी पुरवठा दुरुस्ती करणे 3 लाख, कानसे येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये नळपाणी पुरवठा दुरुस्ती करणे 3 लाख, ढाकाळे, जंगलेवाडी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये नळ पाणी पुरवठा दुरुस्ती करणे 3 लाख, पोखरी भागीतवाडी येथे सभामंडप बांधणे 3 लाख, गावडेवाडी पुनर्वसन येथे मुक्ताबाई मंदिर येथे सभामंडप बांधणे 3 लाख, ठाकरवाडी येथे सभामंडप बांधणे 3 लाख, गावडेवाडी येथील माथावस्ती ते चर्मकारवस्ती रस्ता करणे 3 लाख, गावडेवाडी येथे जिल्हा परिषद शाळा ते औदुंबरेश्वर मंदिर रस्ता करणे 3 लाख, गावडेवाडी येथे फुलवडे पुनर्वसन ते हिंमको वस्ती रस्ता करणे 3 लाख, गावडेवाडी येथील माथावस्ती रस्ता करणे 3 लाख, गोहेबुद्रुक येथे उपळवाडी रस्ता करणे 3 लाख, तिरपाड ढाकेवाडी रस्ता करणे 5 लाख, शिनोली येथे इंदिरानगर रस्ता करणे 4 लाख, जांभोरी येथे माचीचीवाडी रस्ता करणे 3 लाख, ठाकरवाडी येथे ठाकरवाडी ते बागवस्ती रस्ता करणे 3 लाख, टाकेवाडी येथे ठाकरवाडी अंतर्गत रस्ता करणे 3 लाख, वडगाव काशिंबेग येथे मातंगवस्ती रस्ता करणे 3 लाख, मंचर येथे मातंगवस्ती रस्ता करणे 5 लाख, जारकरवाडी येथे माध्यमिक विदयालय ते लबडेमळा रस्ता करणे 5 लाख, जारकरवाडी येथे गावठाण अंतर्गत रस्ता करणे 5 लाख, कळंब येथे कळंबई येथे बंदिस्त गटर बांधणे 3 लाख, पिंपळगाव तर्फे महाळुंगे येथे मांतगवस्ती ते बौदधवस्ती रस्ता करणे 3 लाख, जांबुत येथील सरदवाडी येथे गणेश मदिर सभामंडप बांधणे 5 लाख, पाबळ-इंदिरानगर येथे सभामंडप बांधणे 3 लाख, केंदुर-नाईकवाडा येथे समाज मंदिर बांधणे 3 लाख रुपये मंजूर झाले आहेत.