मॉस्को – शास्त्रज्ञ आणि संशोधक जेव्हा चुकतात तेव्हा कशा प्रकारच्या गंभीर समस्या निर्माण होतात याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणून तुर्कमेनिस्तानातील एका आगीकडे लक्ष वेधावे लागते तुर्कमेनिस्तानमधील ही आग तब्बल पन्नास वर्ष धुमसत असून ही आग विझवण्यात अद्यापही यश आलेले नाही.
1971 मध्ये सुरू झालेली ही आग अजूनही धुमसत असून ही आग ज्या ठी लागली आहे ते ठिकाण नरक द्वार म्हणून ओळखले जाते आणि या नरकाचे द्वार बंद करण्यात अद्यापही संबंधितांना यश आलेले नाही ज्या खड्ड्यामध्ये ही आग लागली आहे तो खड्डा 60 मीटर व्यासाचा अडीचशे फूट रुंद आहे त्याशिवाय हा खड्डा मीटर खोल ही आहे.
राजधानी आस्काबादपासून दीडशे मैल अंतरावर ही आग पन्नास वर्ष धुमसत आहे 50 वर्षपूर्वी या प्रदेशात तेलाचा शोध सुरू असताना एका खड्ड्यात गॅस जमा झाला तो बाजुला करण्यासाठी शास्त्रज्ञांनी खड्डा पेटवण्याचा निर्णय घेतला गॅस संपल्यानंतर आग विझेल असे वाटत होते अद्यापही पन्नास वर्ष ती आग त्याच तीव्रतेने धुमसत आहे.
राष्ट्रपतींनी ही आग आता कायमची विजवण्यासाठी पुन्हा एकदा आदेश दिले असले तरी नरकाचे हे द्वार कशाप्रकारे बंद करायचे याबाबत संभ्रम अजूनही कायम आहे या खड्ड्यात जो ग्यास आहे तो संपला की आपोआप आग विझेल असे शास्त्रज्ञांना वाटत होते पण काही ना काही कारणांनी या खड्ड्यातील गॅस संपत नसल्याने ही आग अद्यापही कायम आहे.