मुंबई – बॉलीवूडची अभिनेत्री ‘तापसी पन्नू’ बेधडक आणि हटके स्वभावासाठी इंडस्ट्रीत ओळखली जाते. मात्र, कदाचित ती आता बोल्ड लूकसाठीसुद्धा ओळखली जाऊ शकते. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने आगामी थ्रिलर चित्रपट ‘फिर आयी हसीन दिलरुबा’च अधिकृत पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. सस्पेन्स आणि रोमान्सचा तडका असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2021 साली तापसी पन्नूचा ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा आता पुढचा भाग म्हणजेच, ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, आता याच चित्रपटातील आणखी एक फोटो तापसीने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
शेअर केलेल्या या फोटोमध्ये तापसी पन्नू ब्लू कलरच्या साडीमध्ये कमालीची दिसत होती. तिचा मादक अंदाज चाहत्यांना खूप आवडला होता. या सोबतच तापसीने नुकतंच ‘लॅक्मे फॅशन वीक’ मध्ये रॅम्प वॉक केला. यावेळी तिच्या लूकवरुन तिला प्रचंड ट्रोल केलं जातंय. यावेळी तापसी पन्नूने बोल्ड नेकलाइनसह हॉट रेड ड्रेसमध्ये रॅम्प वॉक केला.
या ड्रेससोबत तिने हेवी डिझायनर नेकपीस घातला होता, ज्यावर लक्ष्मीची मूर्ती होती. हा फोटो शेअर करताना तापसीने लिहिले आहे की, ‘हा लाल रंग मला कधी सोडेल? मात्र या फोटोमुळे लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केल्याचं दिसून येतंय. “हा हिंदू धर्माचा ‘अपमान’ आहे..’ अशा कमेंट्स त्यावर आल्या. तर बोल्ड लूकवर लक्ष्मीचा फोटो वापरणे म्हणजे देवीचा अपमान आहे असं काहींनी म्हटलंय.