Virat Kohli – टी-२० विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला असून संघाने नेट्समध्ये सराव करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने नेट्समध्ये कसून सराव केला आहे. नेट्समध्ये सराव करतानाचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेत सर्वच सहभागी संघ मोठ्या ताकदीने उतरणार आहेत.
विश्वचषकात भारतीय संघाच्या फलंदाजीत विराटची ( Virat Kohli ) कामगिरी महत्वाची राहणार आहे. त्याने आशिया चषक स्पर्धेपासून टी-२० क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे विराट सध्या चांगल्या लयीत असून येणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियात पोहोचताच भारतीय संघाने सराव करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी विराट कोहली आणि संघाचा उपकर्णधार केएल राहुल यांनी कसून सराव केला आहे.
Long net session for Kohli and KL Rahul at the WACA this morning. #Cricket #kohli pic.twitter.com/QGAe98v5N6
— Gav Joshi (@Gampa_cricket) October 8, 2022
विराट कोहलीने ( Virat Kohli ) भारतासाठी आतापर्यंत चार टी-२० विश्वचषक खेळले आहेत. त्याचबरोबर तो सध्या या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू आहे. विराटच्या नावावर टी-२० विश्वचषकात एकूण २१ सामन्यांत ८४५ धावा आहेत. तसेच महेला जयवर्धने (१,०१६), ख्रिस गेल (९६५), तिलकरत्ने दिलशान (८९७) आणि रोहित शर्मा (८४७ धावा) या यादीत कोहलीच्या पुढे आहेत. त्यामुळे विराटला यंदाच्या स्पर्धेत जयवर्धनेला मागे टाकत पहिलं स्थान मिळवण्याची संधी आहे.