रिझर्व्ह बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी टी रविशंकर

मुंबई – सरकारने रिझर्व्ह बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी टी रविशंकर यांची नियुक्ती केली आहे. सध्या ते या बॅंकेचे कार्यकारी संचालक आहेत. रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर बी. पी. कानुनगो हे निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी रविशंकर यांना नेमण्यात आले आहे.

शनिवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने त्यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखवला. त्यांची ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे. रिझर्व्ह बॅंकेला सध्या अन्य तीन डेप्युटी गव्हर्नर असून त्यांच्याकडे विविध विभागांचे प्रमुखपद असते. 

रविशंकर यांच्याकडे आर्थिक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, पेमेंट सिस्टीम, आणि रिस्क मॉनिटरिंग अशा विभागांचे काम सोपवले जाण्याची शक्‍यता आहे. रविशंकर यांनी सप्टेंबर 1990 मध्ये रिसर्च ऑफिसर म्हणून या बॅंकेत सेवा सुरू केली होती. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून विज्ञान आणि स्टॅटिस्टीकची मास्टर्स डिग्री मिळवली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.