मुंबई – महाराष्ट्र निवनिर्माण सेनेनं कायमच मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. मराठी पाट्यांचा आंदोलन असो वा मराठी सिनेमांना चित्रपटगृह मिळवून देणं असो मनसेनं नेहमीच नेहमीच मराठीसाठी आवाज उठवला आहे. मनसेच्या अशाच एका प्रयत्नामुळे आता टी २० विश्वचषकाचे कॉमेंट्री देखील मराठीत ऐकता येणार आहे.
दिवाळीनंतर टी २० वर्ल्डकप स्पर्धा सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या स्पर्धेकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. शिवाय भारत पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी पुन्हा आमने सामने येणार असल्यामुळे याची उत्सुकता अधिक वाढणार आहे. अशात मनसेच्या टेलिकॉम सेनेने आंदोलन करण्याचा इशारा देत मराठी कमेंट्रीचा आग्रह धरला होता. याच अनुषंगाने स्टार स्पोर्ट्सचे अधिकारी आज (शुक्रवार) राज ठाकरेंची भेट घेणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचा मोठा विजय!!!!
स्टार स्पोर्ट्स चॅनेलचे प्रशासकीय अधिकारी उद्या दुपारी १२.३० वा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी येणार. @mnsadhikrut@abpmajhatv@TV9Marathi@ibnlokmattv1 @zee24taasnews @saammarathi https://t.co/p49wsohn6X— Satish R Narkar (@SatishRNarkar1) October 13, 2022
मनसेचे टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष सतीश नार्वेकर यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. हा मनसेचा मोठा विजय असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. तसेच इतर भाषांप्रमाणे आता मराठीतही कॅमेंट्री सर्वांना पाहता येईल अशी आशा मनसेला आहे. त्यामुळे आता २३ ऑक्टोबर ला होणाऱ्या भारत पाकिस्तानच्या मॅचचा अधिक रंजक पद्धतीने महाराष्ट्राला घेता येईल अशी अशा मनसेला आहे.