“हरित स्मार्ट टाऊनशीप’साठी स्वित्झरलॅन्ड करणार सहकार्य

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हरित टाऊनशीप उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

स्वित्झरलॅन्ड येथील 2000 वॅट स्मार्ट सिटी संघटनेशी पीएमआरडीए सामंजस्य करार करणार आहे. या नुसार पीएमआरडीए हद्दीत हरित टाऊनशीपसाठी पायाभूत सिविधा विकसित करणे आणि कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी ही संघटना प्रयत्न करणार आहे.

पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये अनेक हरित टाऊनशीप उभारण्यात येणार आहे. यासाठी 2000 वॅट स्मार्ट सिटी संघटना प्रयत्न करणार आहे. हरित टाऊनशीपमधील रहिवाशांना हरित शहरात राहण्याचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर हरित उद्योग, हरित तंत्रज्ञान विकसित होण्यास मदत होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.