काबूल : दक्षिणी अफगाणिस्तानच्या जबुल शहरात गुरुवारी सकाळी आत्मघाती स्फोट झाला, त्यात 10 जण जागीच ठार झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या स्फोटात 85 जण गंभीर जखमी झाले. या स्फोटामुळे बरीच कार्यालये आणि घरांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रीय सुरक्षा संचालनालय (एनडीएस) कार्यालय रुग्णालयाच्या अगदी जवळ हा स्फोट झाला आहे. कंधहार शहरातून रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या आणि जखमींना कंधहार येथील रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आले. जबुल प्रांताच्या राज्यपालांनी घटनेची माहिती दिली. या हल्ल्याची तालिबानने जबाबदारी घेतली आहे.