नगर – शहरातील धार्मिक प्रार्थनास्थळांवर महापालिकेकडून आकारला जाणारा मालमत्ता कर शासनाच्या आदेशानुसार रद्द करण्यात यावा अशी मागणी आ.संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्याकडे केली आहे.
आ.संग्राम जगताप यांच्यासह अहमदनगर डिस्ट्रिक्ट रेव्हरंड ऍण्ड पास्टर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आयुक्त भालसिंग यांची बुधवारी (दि.18) दुपारी भेट घेऊन याबाबत चर्चा केली. डिस्ट्रिक्ट रेव्हरंड ऍण्ड पास्टर्स असोसिएशनच्यावतीने आ.जगताप यांना निवेदन देऊन ही बाब निदर्शनास आणून दिली होती. तसेच धार्मिकस्थळांना करमाफी बाबतचा शासन आदेशही या शिष्टमंडळाने आ.जगताप यांना दाखविला होता.
त्यानुसार आ.जगताप यांनी या शिष्टमंडळाला सोबत घेऊन आयुक्तांची भेट घेतली. शासनाचा आदेश आल्यानंतर महापालिकेने यापूर्वी मालमत्ता कर वसुली थांबविली होती मात्र 1-2 वर्षानंतर पुन्हा ही वसुली सुरु करण्यात आली असल्याचे यावेळी आयुक्तांच्या निदर्शनास आणुन देण्यात आले. याबाबत तातडीने माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्त भालसिंग यांनी दिले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष शामवेल भिंगारदिवे, उपाध्यक्ष दिपक पाडळे, सेक्रेटरी सुधाकर साळवे, तानाजी पाडळे, एम.एम.सावंत, एस.डी.नाईक, आनंद घोरपडे, सुनिल वाघमारे, ए.पी.गोरडे, अशोक पाडळे, प्रमोद शिरसाठ, भाऊसाहेब गायकवाड, अमोल पाटोळे, मोझेस नेटके, हरिदास कसबे, संजय घाटविसावे, सनी गायकवाड यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते.