उंब्रज (प्रतिनिधी) – येथील विहिरीत पोहणार्या सात युवकांवर पोलिसांनी संचारबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. अक्षय जाधव (वय 22), प्रसाद जाधव (वय21), संभाजी जाधव (वय27), योगेश घाडगे (वय 20), ओंमकार घाडगे (वय 22), किशोर पाटणकर (वय 21), वैभव राऊत (वय 24) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उंब्रज येथे रविवार दि. 29 रोजी विहिरीत पोहण्यासाठी गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दुपारी अडीच वाजता विहिरीवर जाऊन अक्षय जाधव, प्रसाद जाधव, संभाजी जाधव, योगेश घाडगे, ओंमकार घाडगे, किशोर पाटणकर, वैभव राऊत यांना ताब्यात घेतले. संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार सचीन ससाणे यांनी फिर्याद दिली आहे. तपास युवराज पवार करत आहेत.