पुसेगाव – स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या बुध येथील नागनाथ विद्यामंदिरामध्ये स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन सरपंच अभयसिंह राजेघाटगे, शाळा व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, प्राचार्य टी. आर. फकीर, प्रकाश राजेघाटगे, शंकर डांगे, विकास त्रिपुटे, राहुल कदम, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रंथदिंडी व नवीन नोटीस बोर्डचे उद्घघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गायत्री संतोष खवळे या विद्यार्थिनीने स्वामी विवेकानंद यांचे विचार मनोगतात मांडले. तसेच तन्वी मेत्रे व विश्वजीत दडस या विद्यार्थ्यांनी जिजाऊ यांच्या कार्यांचा गुणगौरव भाषणातून व्यक्त केला.
पर्यवेक्षक संजय कांबळे यांनी विवेकानंद व जिजाऊ यांच्या कार्याचा आढावा सांगितला. फकीर यांनी या सप्ताहामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये निबंध ,वक्तृत्व ,चित्रकला टॅलेंट सर्च, रांगोळी, खेळ आणि फनीगेम्स अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याचा विकास व्हावा, या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपले कौशल्य सिद्ध करावे, असे आवाहन केले.
पूर्वीपासूनच हा सप्ताह मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी या सप्ताह मधील स्पर्धेत भाग घेऊन आपल्या कलागुणांचा विकास करावा म्हणजे व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन अभयसिंह राजेघाटगे यांनी केले.
चंद्रकांत चव्हाण, शंकर डांगे यांनीआपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे प्राचार्य फकीर यांनी स्वागत केले. अर्चना फुलारे व जाधव मॅडम यांचे स्वागत खोत यांनी केले. स्वामी विवेकानंद व बापूंजी साळुंखे यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक लेझीम पथकाच्या मदतीने संपूर्ण गावातून काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषणा देऊनजनजागृती केली. ग्रंथदिंडीत व विविध वेशभूषामध्ये विद्यार्थी समाजसुधारक होऊन प्रभात फेरीत सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान सरवदे यानी केले तर आभार नाना दडस यानी मानले. लेझीम यांच्या कवायती नवनाथ काळे व संताजी देसाई यांनी बसून घेतले.