हडपसर – हिंदकेसरी विजेता मल्ल अभिजीत कटके याला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी दोन लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य दिले आहे. मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनादेश, मानाची गदा, शाल श्रीफळ देऊन अभिजीत कटके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
पुणे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्यासह जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, सचिन तरवडे, करण भानगिरे, आकाश भानगिरे, अमित दाभाडे यावेळी उपस्थित होते. नाना भानगिरे म्हणाले, “अभिजित कटके यांनी मिळवलेल्या यशाने राज्याच्या नावलौकीकात भर पडली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश मिळवावे, यासाठी राज्यसरकारसह समाजातील दानशुरांनी त्याच्या पुढील सरावासाठी आर्थिक मदत करावी.’