मंचर, (प्रतिनिधी)- येथील बेंडे मळ्यातील मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा पार पडला. या वेळी विविध कार्यक्रम संपन्न झाले. सकाळी अश्विन बाणखेले, अनिकेत सोमवंशी यांच्या शुभहस्ते महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर होम हवन चा कार्यक्रम पार पडला.
या वेळी प्रगती बेंडे परीवाराने सहभाग घेतला. स्वामी चरीत्र पठण संतोष त्रिवेदी (काका) यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. स्वामी समर्थांच्या पादुकांचे पूजन डी. के. वळसे पाटील, संतोष वळसे पाटील, विलास शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची मंचर शहरातून पालखी प्रदक्षिणा झाली.
यावेळी ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संखेने सहभागी झाले होते. यामध्ये महिला भक्तांनी रिंगण, फुगड्या खेळून आनंद लुटला. स्वामी समर्थांची महाआरती करण्यात आली. त्यानंतर अन्नप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये जवळजवळ 4000 स्वामीभक्तांनी अन्नप्रसादाचा लाभ घेतला.
स्वामी समर्थांचे मंदिर फुलांनी सजवण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी स्वामी भक्तांनी अन्नप्रसादासाठी लागणार्या देणगी स्वरुपात आपला सहभाग नोंदवला. यासाठी उद्योजक सतीश बेंडे पाटील, शेखर जाधव, जगदीश घिसे, अवधुत ज्ञानेश्वर खानदेशी, अनिता बेंडे, नीता शिंदे, अनिता थोरात, लिलाबाई शेटे, सीताबाई बेंडे, वैशाली बेंडे या भक्तांसह मुंजोबा मित्र मंडळाचे सभासद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.