प्रचारसभेत सहभागी झाल्याने नरसिंगवर निलंबनाची कारवाई

मुंबई – उत्तर-पश्‍चिम मुंबईमधील कॉंग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारसभेत सहभागी होणे पैलवान नरसिंग यादव याला चांगलंच महागात पडले आहे. प्रचारसभेत सहभागी झाल्याने त्याला महाराष्ट्र पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे.

नरसिंग यादव हा मुंबईत सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत आहे. मात्र त्याने कॉंग्रेसचे उमेदवार संजय निरूपम यांच्या प्रचारसभेत हजेरी लावली. सरकारी पदावर असताना राजकीय प्रचार केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी अंधेरील अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नरसिंग यादवविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, ऑलिम्पिक पदक विजेता नरसिंह यादवची 2012मध्ये महाराष्ट्र पोलीसमध्ये डीवायएसपी पदी नियुक्‍ती करण्यात आली होती.2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये सूवर्ण पदक जिंकल्यानंतर नरसिंह क्‍सास-1 पदाच्या नोकरीसाठी पात्र झाला होता. मात्र पदवीधर नसल्याने त्यावेळी नरसिंग सेवेत रुजू होऊ शकला नव्हता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.