इस्लामाबाद – पाकिस्तान ची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत असून या पार्श्वभूमीवर अनेक मनोरंजक घटना समोर येत आहेत सर्वसामान्य जीवनावश्यक वस्तूही सहजपणे उपलब्ध होत नसल्याने एका रेल्वे चालकाने चक्क दही खरेदी करण्यासाठी रेल्वे थांबवण्याची घटना घडली आहे.
Inter-city train driver in Lahore gets suspended after making unscheduled stop to pick up some yoghurt.#pakistan #Railway #ViralVideo pic.twitter.com/n6csvNXksQ
— Naila Tanveer🦋 (@nailatanveer) December 8, 2021
ही घटना लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने संबंधित चालकावर कारवाई केली आहे. पण सध्या पाकिस्तानमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. पाकिस्तान मधील सोशल माध्यमांवर काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला यामध्ये एक रेल्वे अचानक थांबवण्यात येऊन त्यातील चालक खाली उतरला आणि रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या एका दुकानातून त्यांना दही खरेदी केले त्याच्यासोबत त्याचा सहाय्यकही होता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे मंत्री आझम खान यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले हा प्रकार खरा असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी संबंधित चालक आणि त्याचा सहाय्यक या दोघांनाही निलंबित केले आहे.
पाकिस्तान मधील रेल्वे प्रशासन अत्यंत ढिसाळ असून अशा गमतीजमतीच्या घटना नेहमीच घडत असतात काय यापूर्वी रेल्वे प्रशासनाने रेल्वेचे चालक आणि इतर कर्मचारी यांना मोबाईल वापरण्यास बंदी घातली होती. मोबाईल वापरण्याचा नादात कर्मचारी आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे तेव्हा लक्षात आले होते. आता दही खरेदी करण्यासाठी एका चालकाने स्टेशन नसतानाही रेल्वे थांबवल्याने त्याची गंभीर दखल रेल्वे मंत्रालयाने घेतली आहे आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशाराही रेल्वे कर्मचाऱ्यांना दिला आहे.