पिंपरी – पहिली पत्नी जिवंत असतानाही फसवून दुसऱ्या तरूणीशी लग्न केले. तसेच तरुणीकडून पैसे घेऊन तिची फसवणूक केली. तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला. याप्रकरणी हा प्रकार संत तुकारामनगर पोलीस चौकीच्या पाठीमागे घडला.
याप्रकरणी पीडित महिलेने मंगळवारी (दि. 7) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 33 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2020 ते 7 सप्टेंबर 2021 या कालावधीत संत तुकारामनगर पोलीस चौकीच्या पाठीमागे घडला.
आरोपीने स्वतःचे पहिले लग्न लपवून ठेऊन फिर्यादी महिलेसोबत दुसरे लग्न केले. त्यानंतर आरोपीने कार घेण्यासाठी पैसे मागितले. परंतु फिर्यादीने नकार दिला. आरोपीने फिर्यादीस मारहाण करून अनैसर्गिक संभोग केला. शिवीगाळ करत 7 सप्टेंबर रोजी फिर्यादीला काहीही न सांगता घर सोडून निघून गेला.